वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्य सरकारच्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा लोहारा येथे सोमवारी (दि.१) शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला थेट ग्राहकापर्यंत पोहोचविणे हाच उद्देश या योजनेचा आहे. या शुभारंभ प्रसंगी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्यासह एस. टी. चेंडकाळे, के. के. पवार, यू. एस. बिराजदार, कृषी सहाय्यक नागेश जट्टे व शेतकरी उपस्थित होते. यामुळे शेतकरी बांधवांनी पिकविलेला भाजीपाला थेट ग्राहकांना मिळण्यास मदत होणार आहे.