वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना तालुकाप्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे स्वतः अमोल बिराजदार यांनी समोर उभा राहून प्रभाग सहा मधील फवारणी पूर्ण करून घेतली.
लोहारा शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेने लोहारा शहरातील संपुर्ण रस्ते, गल्ली व घरे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याच अनुशंगाने प्रभाग क्र. 6 मध्ये युवासेना तालुकाप्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या पुढाकाराने ही फवारणी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी अमोल बिराजदार यांच्या दुचाकीचा छोटासा अपघात झाला होता. यात त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना बेल्ट घालून पूर्ण वेळ आराम करण्यासाठी सांगितले असतानाही अमोल हे स्वतः समोर थांबून प्रभागात फवारणी करून घेत आहेत.
आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या माध्यमातून लोहारा शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात ही फवारणी करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. अमोल बिराजदार यांनी काही दिवसांपूर्वी प्रभागातील सर्व कुटुंबांना स्टीमरचे वाटप केले आहे.