वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळताच समाजसेवक तथा मेडीकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार यांनी पाहणी करून लगेच स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने सदरील घरातील पाणी काढुन दिले.
लोहारा शहरासह परिसरात सोमवारी ( दि.३१) दुपारी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास एक तास झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच शहरातील अनेक भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच शहराजवळील ओढे वाहत होते. अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्येही अनेक घरात पाणी शिरले होते. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. घरात पाणी शिरल्याने काही नागरीकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली होती. मैनोद्दिन बागवान, यासीन बागवान, सागर घोडके, अकबर जेवळे, बापु लोळगे, माणिक चिकटे, शंकर सुतार, फेरोज गवंडी, अमीन बागवान, प्रकाश चिकटे, विश्वनाथ सुतार आदिच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. याची माहीती कळताच समाजसेवक तथा मेडीकल असोसिएशनचे लोहारा तालुकाध्यक्ष भरत सुतार यांनी पाहणी करून लगेच स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने सदरील घरातील पाणी काढून दिले.






