वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली. तसेच शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत नंदीध्वजारोहण व जन्मोत्सव निमित्त पाळणा कार्यक्रम घेण्यात आला.
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त लोहारा शहरातील मंदिरात विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी नागन्ना वकील यांच्या हस्ते नंदीध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शंकर अण्णा जट्टे, बालाजी मेनकुदळे, शिवा स्वामी, इराप्पा फावडे, हरी लोखंडे, माधव वकील उपस्थित होते. अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या निर्मला शिवलिंग स्वामी, सुरेखा शिवशंकर जट्टे, शैला उमाशंकर जट्टे यांनी बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त मंदिरात पाळणा कार्यक्रम केला.
यावेळी श्रीशैल्य स्वामी, शशांक पाटील, विरभद्र फावडे, श्रीशैल्य मिटकरी, महेश कुंभार, प्रसाद मिटकरी, सचिन तोडकरी, गणेश कमलापुरे, विशाल स्वामी उपस्थित होते. कोविड १९ चा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेत प्रशासनाला सहकार्य करीत बसव भक्तांनी घरातच महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी केली.