वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील लोकवाचनालयात गुरुवारी (दि.१६) महाराज मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा लोकवाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रघुवीर घोडके, विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, विजय महानोर, शफिक जमादार, नरहरी क्षीरसागर यांची उपस्थिती होती.