वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोविड १९ लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सोमवारी (दि. ५) लोहारा ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सध्या कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी शासनाने लसीकरणाची सुरवात केली आहे. परंतू या लसीकरणाविषयी शंका व्यक्त करत अनेकजण लस घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुक्तार चाऊस, जिल्हा सहचिटनिस शब्बीर गवंडी, लक्ष्मण रसाळ, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष शरीफा नवाज सय्यद, महिला शहराध्यक्षा सुलोचना लक्ष्मण रसाळ, डॉ. ज्योती कोकणे, संगीता स्वामी, स्वप्नील माटे, आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. काळे म्हणाले की, कोविड ची लस ही सुरक्षित आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी ही लस घेणे गरजेचे आहे. त्यानंतर तालुकाध्यक्ष सुनील साळुंके म्हणाले की, ही लस सुरक्षित असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोहारा शहरासह तालुक्यात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्रामीण रुग्णालयातील कार्यक्रमानंतर रुग्णालयाच्या बाजूच्या परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन लस घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.