उस्मानाबाद / सुमित झिंगाडे
राष्ट्रीयकाँग्रेस पक्षाने देशाच्या विकासात जे योगदान दिले आहे. ते आपणाला विसरता येणार नाही. काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशांमध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य केले आहे. तोच विकासाचा दृष्टिकोन घेऊन विकासानेच विकासाचे राजकारण करू यात असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांनी केले. भुसणी, ता. उमरगा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या समोरील मैदानावर आयोजित ग्रामपंचायत निवडणुक ग्राम विकास पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बुधवारी (ता. १४) रोजी ते बोलत होते. विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विश्वनाथ संगशेट्टे अध्यक्षस्थानी होते. यावेळी तुगावचे सरपंच लोखंडे, युवक काँग्रेसचे उमरगा-लोहारा तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी नगरसेवक महेश माशाळकर, सुरेश मंडले, मा. सरपंच बालाजी व्हनाजे, सोसायटी माजी चेअरमन माहादेव पाटील, सोसायटी चेअरमन बालाजी संगसट्टे, सह सरपंच पदाचे उमेदवार पौर्णिमा गायकवाड, उमेदवार शेवंता सुरवसे, महादेव संगसट्टे, विमलबाई गाडेकर, सतिश कांबळे, प्रतिभा सगर, राणी व्हनाजे, प्रशांत गायकवाड, शगिराबी ग्यारहघरवाले, भुसणीवाडीतील भिमाबाई मंडले, दशरथ मंडले, धनराज वासुदेव आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना शरणजी पाटील म्हणाले की, भुसणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. उमाकांत बिराजदार, काशिनाथ पांचाळ, बसवराज संगसट्टे, भुताळी गाडेकर, कैलास गायकवाड, सागर मंडले, आनंद कांबळे, सौरंभ कांबळे, राहूल गायकवाड, सुभाष गायकवाड, राजेंद्र व्हनाजे, गुंडप्पा तारुनगे, प्रल्हाद सगर, पिराप्पा कडले आदींनी पुढाकार घेऊन गावातून ढोल ताशाच्या गजरात पदयात्रा काढली. या पदयात्रेस गावातील युवक, महिला व नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद होता,