वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे शॉट सर्किट होऊन ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) तालुक्यातील मार्डी शिवारात घडली आहे. याप्रकरणी महावितरण, कृषी विभाग, महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.
https://youtube.com/shorts/78HOXvGirbM?feature=share
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील मार्डी येथील बळीराम बाबुराव देवकर यांचे गट नंबर ३०४ मध्ये ३ हेक्टर १८ आर इतके क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रात त्यांनी ऊस लागण केली होती. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक लाईटच्या तारांचे शॉट सर्किट होऊन त्यांच्या उसाला आग लागली. त्यानंतर त्यांनी फोन करून त्यांच्या भावाला व गावातील माणसांना बोलावून घेतले. तसेच लोकमंगल कारखान्याची अग्निशमन गाडी बोलावून घेतली. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यांचा १ हेक्टर ८० आर एवढा ऊस जळून खाक झाला. तसेच या आगीत स्प्रिंकलर सट, ड्रीप पाईप लाईन जळून खाक झाले आहे. ऊस व स्प्रिंकलर सट, ड्रीप पाईपलाईन असे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. या घटनेचा महावितरण चे राम दीक्षित, राहुल लांडगे कृषी सहाय्यक शैलेश जट्टे, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे कर्मचारी सलीम मुल्ला, क्षीरसागर साहेब यांनी शनिवारी (दि. १९) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.