वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे म्हणून लोहारा नगरपंचायतचे नगरसेवक अविनाश माळी यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून व निसर्गमित्र, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी यांच्या कल्पनेतून लोहारा शहरातील तहसील कार्यालयातील उन्हामुळे व पाण्याअभावी वाळत असलेल्या झाडांना बुधवारी (दि.२०) टँकरने पाणी देवून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, दत्ता जावळे पाटील, नीलकंठ कांबळे, शहाजी जाधव, रमेश वाघुले, भागवत गायकवाड, शफीक जमादार, अभिजित गायकवाड, विरेश स्वामी, आदी उपस्थित होते.






