वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. परंतु त्यानंतर शिंदे व ठाकरे गटाकडून आमचीच शिवसेना खरी आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज मंगळवारी १७ जानेवारी दुपारी चार वाजता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. पक्ष चिन्हाच्या हक्काबाबत १२ डिसेंबर २०२२ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात आली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकरणावर पुढील सोनवणे आज १७ जानेवारीला दुपारी चार वाजता होणार आहे. शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह कोणाला मिळणार याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. त्यामुळे पक्षाचे नाव व चिन्ह कोणाला मिळणार, निवडणूक आयोग काय निकाल देणार याकडे राज्यातील संपूर्ण राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.