वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि. या कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पुजनाचा व हायड्रोलिक ट्रिपलर बांधकामाचे भुमीपूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. येत्या हंगामात कारखान्याचे ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून सदर हंगामासाठी लागणाऱ्या तोडणी वाहतूक यंत्रणेची भरती करण्यात आली आहे. तसेच मशिनरी ओव्हरहॉलींग, दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर चालु आहेत. अनेक अडथळयावर मात करत कारखान्याची यशस्वी वाटचाल चालु असुन येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबध्द पध्दतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल अशी खात्री कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बापुराव पाटील, जि प चे विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकमिया काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठलराव बदोले, विठ्ठलराव पाटील, दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, माणिक राठोड, राजु हेबळे, सुभाष पाटील व सर्व संचालक मंडळ, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी. अथणी, चिफ इंजिनियर ए. एल. अष्टेकर, चिफ केमीस्ट एस.बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए.बी. राखेलकर, कार्यालय अधिक्षक के.एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.