भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी (दि.१४) सालेगाव ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सालेगावच्या सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रा.प सदस्य परमेश्वर भालेराव, मनोज देशपांडे, उज्ज्वलाबाई बडुरे, किरण पाटील,, ग्रामसेवक एन. बी. भोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, सोसायटी चेअरमन मुरलीधर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, ग्रा.पं. शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे, जीवन पाटील, नितीन देशपांडे, गोपाळ माने, श्रावण चेंडके, सतीश बडुरे, परमेश्वर साळुंके, संतोष भालेराव, अण्णाराव देशपांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.