वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महात्मा फुले जयंती व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दिव्यांग शाळेत लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.११) शालेय साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले.
संभाजी ब्रिगेड जिल्हा धाराशिव प्रमुख शरद पवार यांच्या संकल्पनेतून संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी निवासी
दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, संभाजी ब्रिगेड शेतकरी का. लोहारा तालुका प्रमुख शिवश्री खंडू शिंदे, शहर प्रमुख पदमाकर चव्हाण, स्वप्नील गुंड, शरद जावळे, अमोल बिराजदार, सत्यजित मुसांडे, स्वप्नील पाटील, प्रविण कारवाडे, यांच्यासह सर्व शिक्षक चलवाड मॅडम, शेळगे सर, प्रविण वाघमोडे सर, शिंदे सर, डी.एस.माने, गोरक पालमपल्ले, गिरी महाराज, एस.के.कोरे, सुरेखा परीट, किरण मैंदर्गी, सुनिता कज्जेवाड, कविता भंडारे उपस्थित होते.