वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका कृषी विभागाच्या वतीने सास्तुर येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण पार पडले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी गावागावात जाऊन प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
तालुक्यातील सास्तुर येथे सोमवारी (दि.२४) ग्रामपंचायत कार्यालय सास्तुर येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक दीपक जाधव कृषी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती दिली. तसेच पेरणीचे फायदे एमआरइजीएस अंतर्गत फळबाग लागवड, बियाणे उगम क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, बीज प्रक्रिया, महाडीबीटीवर विविध योजना उपलब्ध असलेल्या ऑनलाईन करणे, जत्रा शासकीय योजनांची याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सास्तुरच्या सरपंच शितल पाटील, कृषी पर्यवेक्षक पी. एस. भोसले, उपसरपंच मिथुन कुर्ले, ग्रामविकास अधिकारी डी. आय. गोरे यांच्यासह छाया गोरख पवार, बारकाबाई युवराज गायकवाड, राजवर्धन पाटील, रोहित पूर्णे, दिलीप बेंडगे, बाबुराव सुतार, राम भालके, बसवराज माळी, छगन सरवदे व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.