वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम(अलिम्को) मुंबई व भारतीय नौवहन निगम लिमिटेड यांनी पोत परिवहन मंत्रालय, मुंबई च्या सी.एस.आर. योजनेअंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद व निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर यांच्या सहकार्याने लोहारा तालुक्यातील दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे/कृत्रिम उपकरणे मोफत वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन दि. २८ व २९ जानेवारी या कालावधीत सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत करण्यात आले आहे. सदर शिबिरात तीन चाकी सायकल, मोटोराईज्ड बाईक, व्हीलचेअर, जयपूर फूट, कॅलिपर्स, कुबड्या, एम.आर.किट्स, श्रवणयंत्र, अंधांसाठी काठी इ. साहित्यासाठी तपासणी करून मोजमाप घेण्यात येणार आहे. शिबिरासाठी आधार कार्ड, ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, रेशनकार्ड/उत्पन्नाचे प्रमाणपत्र, २ पासपोर्ट आकाराचे फोटो इ. कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. सदर शिबीराचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, दिव्यांग विभाग प्रमुख भारत कांबळे व निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी केले आहे.