वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. हराळी गावातील नागरिकांना लसीकरणासाठी तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी संस्थेने वाहनांची व्यवस्था केली आहे. आत्तापर्यंत गावातील एकूण 93 नागरिकांना लस देण्यात आली आहे.
कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 45 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. हराळी येथील नागरिकांसाठी सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. गावातील नागरिकांना लसीकरणासाठी सास्तुर येथे घेऊन जाण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 45 वर्षाच्या पुढील जवळपास 93 नागरिकांना आत्तापर्यंत लस देण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनाही लस घेतली आहे. लसीकरणासाठी संस्थेमार्फत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच लस घेऊन आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची चौकशी करून योग्य तो सल्ला देण्यात येत आहे. संस्थेचे प्रमुख अभिजित कापरे यांच्या वतीने समस्थ नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण योग्य ती काळजी घेऊन 45 वर्षापुढील जेष्ठ व्यक्तींनी न घाबरता लस घ्यावी, त्यासाठी लागणारी वाहन व्यवस्था ही संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी केली जात आहे. त्यामुळे सर्वन्नी प्रशासनाच्या नियमाचे पालन करुन सहकार्य करुया असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढेही गावातील नागरिकांना लसीकरणासाठी घेऊन जाण्यासाठी ही वाहन व्यवस्था सुरू राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगितले आहे.