वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या परिस्थितीत सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अनेक जण आपापल्या परीने शक्य ती मदत करताना दिसत आहेत. लोहारा तालुक्यातील वडगाववाडी या छोट्याशा गावातही हेलपिंग हॅन्डस ग्रुप च्या वतीने रविवारी (दि. ९) मदतीचा हात देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी पासून सर्वत्र कोरोनाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. सुरुवातीला शहरी भागात आढळून येत असलेले रुग्ण हळूहळू ग्रामीण भागातही आढळून येऊ लागले. यामुळे काही दिवस लॉक डाऊन ला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती सुरळीत होऊ लागली, रुग्ण संख्या आटोक्यात आली असे म्हणत असतानाच परत एकदा मार्च २०२१ पासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येऊ लागले. एप्रिल मध्ये तर परिस्थिती खूपच चिंताजनक झाली. तिच परिस्थिती आताही आहे. या भीषण परिस्थितीत एकीकडे शासन, प्रशासन आपापल्या परीने परिस्थिती हाताळत होते तर दुसरीकडे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अनेकजण आपापल्या परीने या संकटकाळात लोकांना मदत करून यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशाच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे हेलपिंग हॅन्डस ग्रुपच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे.
वडगाववाडी हे तालुक्यातील एक छोटेसे गाव. या गावातील तरुण तरुणीनी एकत्र येऊन आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्देशाने हेलपिंग हॅन्डस नावाने एक ग्रुप तयार केला. सन २०१८ पासून प्रत्येक महिन्याला आपल्या पगारीतून, व्यवसातून प्रत्येकी 200 रुपये जमा करण्यास सुरवात केली. हा ग्रुप सुरू केला तेंव्हा ग्रुप मध्ये बारा सदस्य होते. काही दिवसांनी या ग्रुप बद्दल अनेकांना माहिती मिळाली. सध्या या ग्रुप मध्ये ३१ सदस्य आहेत. सदर ग्रुपच्या माध्यमातून जमा झालेल्या रकमेमधून गावातील ज़िल्हा परिषद शाळेसाठी क्रीडा साहित्य, प्रयोग शाळा साहित्य, पांढरे बोर्ड, गॅस कनेकशन, होतकरू विध्यार्थीसाठी आर्थिक मदत, शाळेस वीज पुरवठा बंद असलेला चालू करण्यास मदत, गावातील बोअरवेल साठी आर्थिक मदत, २०२० मध्ये सी. एम. फंडात आर्थिक मदत आदी कामे करण्यात आली. तसेच गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील प्रत्येक घरी एक लिटरचे हॅन्ड वॉश आणि एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
त्यामुळे ग्रुपच्या वतीने गावातील प्रत्येक घरी एक वेपोरायझर मशीन आणि एक हजार एन- ९५ मास्क गावात वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार रविवारी (दि.९) गावातील २५० कुटुंबांना वेपोरायझर मशीन आणि एन- ९५ मास्क वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकांनी योग्य ती काळजी घ्यावी व संसर्ग वाढू नये, गाव कोरोनामुक्त व्हावे एवढीच इच्छा असल्याचे ग्रुप च्या सदस्यांनी सांगितले. हेलपिंग हॅन्डस ग्रुपच्या या कार्याचे वडगाववाडी व परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. ग्रुप च्या या कामासाठी दयानंद पाटील सर, सहदेव गिराम (पोलीस पाटील), दत्तात्रय श्रीशाल गिराम, आकाश प्रकाश भुजबळ, राम बंडू भुजबळ, शंकर सुरेश भुजबळ आदींनी सहकार्य केले.
हेलपिंग हॅन्डस ग्रुप
1) सहदेव गणपती बोडके 2) रवी मारुतीअप्पा भुजबळ 3) बस्वराज गुंडाप्पा भुजबळ 4) प्रवीण मल्लिनाथ पाटील 5) काशिनाथ कोमरिअप्पा रड्डे 6)विश्वनाथ उर्फ ओम शिवरामअप्पा भुजबळ 7) सुप्रिया सुधाकर भुजबळ/सोळसे 8)लक्ष्मीबाई चंद्रकांत गिराम/भुजबळ 9)गजेंद्र महादेव गाडेकर 10)नागनाथ विठ्ठल गिराम 11)शिवरानी विठ्ठल गिराम / जट्टे .12) राहुल बंडू भुजबळ 13) बालाजी माणिक बोडके 14)ब्राह्मनंद मधुकर बेळे 15)अतुल गुरुनाथ भुजबळ 16) कल्लेश्वर सुभाष भुजबळ 17) सोनाली गिविंद भुजबळ /बोगरगे 18) महादेव निवृत्ती ओवांडे 19) शकुंतला किसन बचाटे /उमरगी .20)हनुमंत हरिदास गिराम 21)महेश विष्णू कदम 22) निकेश बाळासाहेब बचाटे 23)शिवराज ज्ञानेश्वर शेटे 24)मंजुषा तुकाराम बादुले /उजनकर 25)शुभम बबन भुजबळ 26) सचिन सुधाकर भुजबळ 27)वैजिनाथ गुरुनाथ भुजबळ 28) सिद्धालिंग लिंबारी बादुले 29)राहुल दत्तात्रय बादुले 30)सोमनाथ माणिक गिराम 31) विष्णू मधुकर बेळे