वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) तीच्या मामाच्या गावी असताना तीच्या इच्छेविरुध्द लग्न जमवल्याच्या कारणावरुन ती मामाच्या घरी कोणास काहीएक न सांगता दि. 21.09.2022 रोजी 14.30 वाजणेच्या सुमारास तीच्या गावी जाण्यासाठी घराबाहेर पडली. दरम्यान ती तीच्या गावी चालत जात असताना रात्री 22.10 वाजनाच्या सुमारास एका 40 वर्षीय पुरुषाने तीला मदतीचा बहाना करुन तीला आपल्यासोबत एका निर्मनुष्य घरात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच तीच्या जवळील सुवर्ण अंगठी घेउन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीचे अश्लील छायाचित्र प्रसारीत करण्याची तीला धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने आज दि. 22.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2) (एफ), 379, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.