वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हापूस आंबा बाजारात कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. अखेर हापूस आंब्याचे आगमन झाले असून कोल्हापूर बाजार समितीत लागलेल्या बोलीत या हापुसला सोन्याचा दर मिळाला आहे. ५ डझन पेटीला ५१ हजारांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या हंगामातील पहिला हापूस आंबा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. यावेळी लागलेल्या बोलीत आंब्याला सोन्याचा दर मिळाल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मुहुर्ताच्या पहिल्याच सौद्यात भारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांच्या पाच डझनच्या पेटीला ५१,००० रुपयांचा भाव मिळाला आहे. येथील खासदार धनंजय महाडिक यांनी ही उच्चांकी बोली लावत कोल्हापुरातील पहिली आंब्याची पेटी घेतली. शनिवारी सकाळी हा पहिला सौदा काढण्यात आला या लीला वात पाच हजार रुपयांपासून सुरू झालेला दर तब्बल ५१ हजार रुपये पर्यंत पोहोचला. पाच डझन पेटीला ५१ हजार रुपयाचा दर म्हणजे १० हजार २०० रुपये डझन. याप्रमाणे एका आंब्याचा दर ठरवलं तर या हापूस आंब्याचा पेटीतील एक आंबा हा तब्बल ८५० रुपयांना मिळाला आहे. आत्तापर्यंत चा हा विक्रमी दर असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.