वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
2 जानेवारी हा पोलीस वर्धापन दिन असल्याने दि. 2 ते 8 जानेवारी या कालावधीत पोलीस दलाच्या वतीने राज्यभरात ‘पोलीस वर्धापन दिन कार्यक्रम’ साजरा केला जात आहे.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमा दरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संगीत वाद्य पथकाद्वारे जनजागृती तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम दि. 2 ते 4 जानेवारी या दरम्यान घेण्यात आला.
यावेळी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत चौक इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी तसेच तुळजापूर, लोहारा व कळंब शहरातील महत्त्वाच्या चौकात,
बस स्थानक, हायस्कुल येथे उस्मानाबाद पोलीस दलातील संगीत वाद्य पथकातील पोलीस अंमलदार बालाजी सहाणे, लक्ष्मण चांदणे, श्रीमंत पालके, रामहरी कांबळे, विकास कसबे, रंजीत लांडगे, सुनिल कांबळे, नितीन रणखांबे यांनी उत्कृष्टरित्या जनजागृती तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले.