वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शनिवारी दि. 19 जून रोजी 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद असे एकूण 10 ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरणाची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. लस घेण्याकरिता लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी किंवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने क्रमाने लस दिली जाणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
खालील ठिकाणी लसीकरण होणार आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद
प्राथमिक आरोग्य केंद्र
लोहारा तालुका – माकणी
उस्मानाबाद तालुका – ढोकी, समुद्रवाणी
तुळजापूर तालुका – नळदुर्ग,
उमरगा तालुका – नाईचाकूर,
कळंब तालुका – दहिफळ,
वाशी तालुका – पारा,
भूम तालुका – पाथरूड,
परांडा तालुका – जवळा (नि)

error: Content is protected !!
No Result
View All Result