वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. 20.02.2023 रोजी पहाटे 04.00 वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरटयांनी तुळजापूर येथील सचिन नानासाहेब शिंदे यांची एस एस कम्युनिकेशन ॲण्ड सर्व्हीसेस मोबाईल दुकानाचे शटर अर्धवट उचकटुन आत प्रवेश करुन ॲपल कंपनीचे व इतर महागडे कंपनीचे 119 मोबाईल फोन व मोबाईल ॲक्सेसरीज अशा एकुण 30,31,381 /- रु चा माल चोरुन घेवुन गेला म्हणुन तुळजापुर पोस्टेला गुरनं 106/23 कलम 461,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास धाराशिवचे मा.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉवत, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, मा.पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापुर पोलीस स्टेशनचे सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोहे/1245 यादव, पोह/1264 लाटे, पोअं/1026 पवार, पोना//837 साळुंखे पोना/1560 माळी, पोअं/158 शिंदे यांनी सदर गुन्हयातील आरोपी 1) अकबर खान हाबिब खान रा. मालेगांव जि. नाशिक 2) आबु शाहिद असरु आली शेख रा. शिवाजीनगर मुंबई यास अटक करण्यात आली आहे. सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोहे/1245 यादव, पोह/1264 लाटे, पोअं/1026 पवार हे मालगांव जि. सदर आरेापी यांचे घराची घर झडती घेवुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी 1) सॅमसंग कंपनीचे 28 मोबाईल 2) विवो कंपनीचे 37 मोबाईल 3) वन प्लस कंपनीचे 01 मोबाईल 4) ओपो कंपनीचे 18 मोबाईल5) रेडमी कंपनीचे 09 मोबाईल 6) ॲपल कंपनीचे 10 मोबाईल 7) नोकिया कंपनीचे 01 मोबाईल असे विविध कंपनीचे एकुण 104 मोबाईल त्यांची एकुण किंमत 23,06,396/- रुपये माल जप्त केला असुन पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि कांबळे हे करीत आहेत.