लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत १३ सुवर्णपदकासह एकूण २३ पदक पटकावले आहेत.
दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, क्रीडा संचालनालय व स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा प्रतिष्ठान संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २३ मार्च २०२५ या कालावधीत रेशीम बाग मैदान, नागपूर येथे दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ३६ जिल्ह्याच्या विविध प्रवर्गातील सुमारे २५०० दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळा व श्री शांतेश्वर कौशल्य विकास संस्थेतील २४ दिव्यांग खेळाडूंनी धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयी घौडदौड कायम राखताना १३ सुवर्ण, ६ रजत व ४ कांस्य असे एकूण २३ पदके पटकावून अस्थिव्यंग प्रवर्गातील उपविजेतेपद धाराशिव जिल्ह्याला मिळवून दिले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना व संघांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त प्रवीण पुरी, समाज कल्याण विभाग, नागपूर प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा प्रतिष्ठान नागपूरचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील निरीक्षक प्रशांत गायकवाड, भारत कांबळे यांच्या हस्ते व उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व संघाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, सुधीर जाधवर, कार्यालयीन अधिक्षक मोहन चव्हाण, संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, मुख्याध्यापक बालाजी नादरगे, व्यवस्थापकीय अधिक्षक भरत बालवाड यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक अंजली चलवाड, मन्मथआप्पा निजवंते, संजय शिंदे, सुरेखा परीट, किरण मैंदर्गी, डी. एस. माने, माधव मुंडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे –
सुवर्णपदक विजेते खेळाडू – अस्थिव्यंग ‘अ’ १०० मीटर धावणे – भाग्येश गुंडू इस्लामपूरे, ५० मीटर फ्री स्टाईल पोहणे – प्रणव सुमंत अडसूळ, १०० व २०० मी.धावणे – मुस्कान इब्राहिम बागवान.
अस्थिव्यंग ‘ब’ – १०० मी. व २०० मी. धावणे – दिनेश मदन वरवटे
अस्थिव्यंग ‘क’ – ५० मीटर फ्री स्टाईल पोहणे – सोमनाथ राजकुमार सुरवसे, २५ मीटर भरभर चालणे – भागवत शिवाजी शिंदे, व्हील चेअरवर बसून सॉफ्ट बॉल थ्रो – कु. संध्यारानी बिभीषण कदम, ५० मीटर धावणे भरभर चालणे – करण केशव शिंदे, कु. दीपा घोसले, व्हील चेअरवर बसून गोळा फेक – कु. किरण बाळू खराते, १०० मीटर व्हील चेअर रेस – राणी मोहन मनाळे
रजतपदक विजेते खेळाडू –
अस्थिव्यंग ‘अ’ २०० मीटर धावणे- कु. ऋतुजा उमेश डिगुळे,
अस्थिव्यंग ‘ ब’ ५० मीटर धावणे – रितेश गणेश देशमुख, अभिषेक शिवाजी धानुरे
अस्थिव्यंग ‘क’ ५० मीटर व्हील चेअर रेस – शैलेश धनराज चित्तापुरे, ५० मीटर धावणे भरभर चालणे – कु . संध्याराणी बिभीषण कदम, ५० मीटर धावणे अथवा भरभर चालणे – सोमनाथ राजकुमार सुरवसे.
कांस्य पदक विजेते खेळाडू –
अस्थिव्यंग ‘क’ कु. राधिका बनसोडे, व्हील चेअर वर बसून सॉफ्ट बॉल थ्रो – कारण बाळू माने, व्हील चेअरवर बसून गोळा फेक – करण केशव शिंदे,१०० मीटर व्हील चेअर रेस – राज संभाजी गायकवाड.






