Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/06/2025
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा आदर्श बनलेले स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूर यांनी ‘कायाकल्प’ आणि ‘इको-फ्रेंडली’ या दोन्ही राज्यस्तरीय गुणवत्तापूर्ण आरोग्य उपक्रमांत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
केंद्र शासनाचा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आरोग्य विभागाच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दिला जाणारा राज्यात प्रथम क्रमांकाचा मानाचा सर्वोच्च पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरला दिनांक १२ जून रोजी जाहीर झाला कायाकल्प मध्ये ९९.८६% गुण मिळवून तसेच इको फ्रेंडली फॅसिलिटी मध्ये ९२.५२% गुणांकन मिळवून २० लाखाचे प्रथम पारितोषक शासन तर्फे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाला जाहीर झाले आहे. राज्यस्तरीय अतिशय कठीण अशा गुणांकन चाचणीमध्ये स्पर्शला हा पुरस्कार मिळाला गेली २५ वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करून राष्ट्रीय व राज्यपाताळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
यावर्षी शासनामार्फत दोन विभागात हे पुरस्कार दिले गेले आहेत रुग्णालयीन स्वच्छता दर्जेदार आरोग्य सेवा व सुविधा यासाठी प्रथम क्रमांकासाठी १५ लाख रुपये तर पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) रुग्णालय प्रथम क्रमांकासाठी ५ लाख रुपये पारितोषिक शासनाने जाहीर केले आहे हे दोन्ही राज्यात प्रथम क्रमांकाचे पुरस्कार स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरला जाहीर झाले. या पुरस्कारासाठी जिल्हा शल्यचिकित्स्य डॉ. धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांचे सततचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे हा पुरस्कार स्पर्शला मिळाल्याचे उद्गार श्री रमाकांत जोशी यांनी काढले कायाकल्प मध्ये मागील दोन वेळा स्पर्शला राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला होता. यावेळी प्रथम क्रमांक मिळवून स्पर्शने दर्जेदार आरोग्य सुविधेमध्ये सातत्य राखले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आरोग्य सेवेत सातत्य टिकवले याबद्दलच सर्व स्तरावर स्पर्श ग्रामीण रुग्णाच्या अभिनंदन केले जात आहे.
कायाकल्पमध्ये रुग्णालयात स्वच्छता, संसर्ग प्रतिबंधन, जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, रुग्णांची समाधानकारक सेवा, रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक आणि कर्मचार्यांाचे प्रशिक्षण यावर मूल्यांकन केले जाते. त्याचप्रमाणे, इको-फ्रेंडली मूल्यांकनामध्ये सौरऊर्जा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक प्रतिबंध, वनीकरण, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे आणि हरित उपक्रम यावर भर दिला जातो.
मागील वर्षी जवळपास ४५१ गावांमधून ४ जिल्ह्यातून रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला छोटे ग्रामीण रुग्णालय अंतर्गत भागात असूनही लोकांचा विश्वासास प्रात्र झालेला आहे. सुरक्षित बाळंतपणे इतर जनरल शस्त्रक्रिया, लहान बाळांचे अतिदक्षता बाह्य रुग्ण व अंतर रुग्णसेवा व प्रत्येकांशी आपुलकीचा संवाद शिवाय १२४ अंतर्गत गावामध्ये आरोग्य शिक्षण व आरोग्यसेवा इत्यादीमुळे स्पर्श लोकांचा विश्वास संपादन करू शकले स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या या यशामागे एकजुटीने काम करणारी टीम, सक्षम नेतृत्व, आणि ग्रामस्तरावर आरोग्य जागरूकतेचा अवलंब हे मुख्य घटक आहेत. उत्कृष्ट टीमवर्क रुग्णांप्रती आपुलकी वागणूक दर्जेदार आरोग्यसेवा यामुळे एवढे मानाची प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाल्याची त्यांनी कायाकल्प मध्ये स्पर्श राज्यात प्रथम झाल्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवेची स्पर्शची जबाबदारी आणखी वाढल्याची भावना श्री रमाकांत जोशी यांनी व्यक्त केली डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार तीन वेळा राज्यात प्रथम, माता बालसंगोपणाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, कायाकल्पमध्ये दोन वेळा राज्यात द्वितीय क्रमांक पुरस्कार, यावर्षी कायाकल्प मध्ये राज्यात प्रथम पुरस्कार NQAS, ISO, LaQshya मानांकन असे अनेक पुरस्कार प्राप्त राज्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय. नुकताच मागील महिन्यात सर्वात जास्त प्रसूतीमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला असल्याचे रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी सांगितले.

Tags: कायाकल्प पुरस्कारस्पर्श ग्रामीण रुग्णालयस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

Next Post

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
Next Post
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's