प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत सुश्रुत हॉस्पीटल धाराशिव यांचे मार्फत दि.२७ जुलै रोजी धाराशिव तालुक्यातील भंडारी येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. यामध्ये १५५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, मोफत रक्त शुगर तपासणी व मोफत औषध वितरण करण्यात आले. तसेच १० जणांचे मोफत आयुष्मान कार्ड काढण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सचिन गायकवाड, प्रसाद सूर्यवंशी, महेश सस्ते यांनी केले. याप्रसंगी सरपंच किशोर पाटील, उपसरपंच प्रदीप पाटील, चेअरमन बाळासाहेब पाटील नाना मुडबे, नागनाथ जाधव, दाजी बोडके, बालाजी सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, भाऊराव पाखरे, तात्याराव मुडबे व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये गावातील गरजू लोकांना मोफत तपासणी केली व औषध देण्यात आली. या कार्यक्रमासाठी मंगेश पाटील, विठ्ठल पाखरे, स्वप्नील सूर्यवंशी व भागवत बनसोडे यांनी सहकार्य केले.