लोहारा / प्रतिनिधी
माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी ( दि.१२) लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पवार साहेबांसोबत राहिलेल्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झालेल्या आठ दशके कृतज्ञतेची हा दैदिप्यमान कार्यक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रॅलीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. मागील अनेक वर्षांपासून पवार साहेबांसोबत राहिलेल्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मानपत्र देऊन यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जेष्ठ मार्गदर्शक गोविंद तात्या साळुंके, किशोर साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवांडकर, अभिजित लोभे, विठ्ठल बुरटूकणे, सलमान सवार, प्रशांत सोमवंशी, किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, जालिंदर कोकणे, हेमंत माळवदकर, प्रकाश भगत, हाजी बाबा शेख, बहादूर मोमीन, शब्बीर गवंडी, मंगेश पाटील, नवाज सय्यद, भास्कर माने, शैलेश चंदनशिवे, सचिन रणखांब, प्रभुराज पनुरे, दादा पाटील, प्रविण पाटील, पांडुरंग पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.