लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंगळवारी (दि.१९) बैठक पार पडली. या बैठकीत सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत अध्यक्षपदी अजित यादव, उपाध्यक्षपदी कैलास इंगळे, सचिव पदी पवन जगताप, सहसचिव पदी प्रविण जगताप, मिरवणूक प्रमुख पदी महेश जगताप व खंडू फत्तेपुरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्वराज ग्रुपचे मार्गदर्शक उपसरपंच हनुमंत कारभारी, तानाजी आनंदगावकर, प्रविण पाटील, अन्नदाते उत्तम सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली. यावेळी गणेशमूर्ती ही युवा उद्योजक प्रज्योत जगताप व बळवंत आनंदगावकर यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दर वर्षी समितीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक कार्य करीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील तो अश्याच समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीसाठी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज जगताप, धनंजय शिंदे, श्रीकांत गिरी, अनंत पोतदार, प्रशांत अभंगराव, माऊली आनंदगावकर, प्रभू खोत, प्रवीण जगताप, सचिन जगताप, सुधाकर साठे, बाळासाहेब आनंदगावकर, राहुल सुरवसे, प्रतिक आनंदगावकर यांच्यासह स्वराज्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.