लोहारा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.१५) अधिकारी व कर्मचारी यांच्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी शाळेतील शिक्षक, शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेस सकाळी आठ वाजून ३० मिनिटाला सुरुवात झाली. प्रत्येक शिक्षकाला योगासना मधील पाच आसन करणे बंधनकारक होते. त्यातून ४६ ते ५० या वयोगटातून स्त्री गटातून लोहारा तालुक्यातील मार्डी जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षिका वर्षा चौधरी यांचा पहिला क्रमांक आला. पुरुष गटातून ४६ ते ५० या वयोगटातून कानेगाव येथील शाळेतील उपक्रमशील शिक्षक मच्छिंद्र बोकडे यांचा पहिला क्रमांक आला. गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, विस्तार अधिकारी व्ही एस. चंदनशिवे, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे यांनी त्यांचा अभिनंदन केले. या दोन्ही शिक्षकांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.









