Vartadoot
Thursday, February 12, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
12/02/2026
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी लोहारा तहसिल कार्यालयात सोमवारी (दि.९) पार पडली. तालुक्यातील तीन गटात व आठ गणात महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर एका गटात उबाठा पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी तहसिल कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात जल्लोष केला.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी शनिवारी (दि.७) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी २७२१७ पुरुष व २४०२२ स्त्री असे एकूण ५१२३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. लोहारा तालुक्यात ५७.३२ टक्के मतदान झाले होते. जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी एकूण १५ तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी एकूण ३० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांनी सभा घेत प्रचार केला होता. तर उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. या निवडणुकीत उमेदवारांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका केल्याचे दिसून आले. मतदानादिवशी काही ठिकाणी झालेल्या किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामुळे प्रत्येक गट, गणात निकाल कसा लागणार याचीच चर्चा सुरू होती.


लोहारा तहसिल कार्यालयात सोमवारी (दि.९) सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात आले. त्यानंतर कानेगाव गटाची मतमोजणी करण्यात आली. यात कानेगाव गटातून शिवसेनेच्या सुवर्णा पाटील ह्या ८१४४ मते घेत विजयी झाल्या. याठिकाणी उबाठाच्या उमेदवार प्रतिभा कदम ( ४५५० मते ) यांचा पराभव झाला. कानेगाव गणात शिवसेनेचे अमोल पाटील व भातागळी गणात भाजपाचे दत्तात्रय वाघमारे विजयी झाले. त्यानंतर माकणी गटाची मतमोजणी करण्यात आली. माकणी गटातून उबाठा पक्षाच्या अश्विनी जवळगे ह्या ६२८० मते घेत विजयी झाल्या. याठिकाणी माकणी गणातून पल्लवी जानकर व धानुरी गणातून भाजपाचे नागनाथ पाटील विजयी झाले. त्यानंतर सास्तुर गटाची मतमोजणी झाली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी कोकणे ह्या ५५७४ मते घेत विजयी झाल्या. सास्तुर गणातून शिवसेनेच्या प्रगती घोटाळे व तावशीगड गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालन कांबळे विजयी झाल्या. शेवटी जेवळी गटाची मतमोजणी झाली. या गटात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांची कन्या श्रुती पनुरे ह्या ६६६५ मते घेत विजयी झाल्या. याठिकाणी जेवळी गणात भाजपाचे स्वप्नील कारभारी व अचलेर गणात शिवसेनेच्या अल्का सुलतानपुरे विजयी झाल्या.

निकाल काय लागणार या उत्सुकतेने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून गर्दी केली होती. जसे जसे निकाल जाहीर होत होते तसे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात जल्लोष करताना दिसत होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तहसिल कार्यालयापासून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

महायुतीचे वर्चस्व

लोहारा तालुक्यात चार गट व आठ गण आहेत. याठिकाणी चार गटांपैकी शिवसेनेने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक व उबाठाने एका जागेवर विजय. तर आठ गणांपैकी शिवसेना चार, भाजपा तीन व राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला. चार गटांपैकी तीन गटात महायुती तर एका गटात उबाठा पक्षाचे उमेदवार विजयी झाले. तसेच महायुतीने सर्वच आठ ठिकाणी विजय मिळवला.

विजयी उमेदवार

कानेगाव गट
सुवर्णा पाटील – शिवसेना

माकणी गट
अश्विनी जवळगे – उबाठा

सास्तुर गट
रोहिणी कोकणे – राष्ट्रवादी काँग्रेस

जेवळी गट

श्रुती पनुरे – शिवसेना

गण – विजयी उमेदवार
कानेगाव – अमोल पाटील – शिवसेना
भातागळी – दत्तात्रय वाघमारे – भाजपा
माकणी – पल्लवी जानकर – शिवसेना
धानुरी – नागनाथ पाटील – भाजपा
सास्तुर – प्रगती घोटाळे – शिवसेना
तावशीगड – मालन कांबळे – राष्ट्रवादी काँग्रेस
जेवळी – स्वप्नील कारभारी – भाजपा

अचलेर – अल्का सुलतानपुरे – शिवसेना

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हा परिषदनिवडणूकपंचायत समितीमहायुती
Previous Post

विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने

Related Posts

विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने
लोहारा तालुका

विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने

11/02/2026
सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निवडणूक

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

05/02/2026
जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा
निवडणूक

कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा

03/02/2026
प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी
लोहारा तालुका

प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी

02/02/2026
लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's