Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
29/05/2026
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथे मोफत आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद; २११ रुग्णांची तपासणी
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २११ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर (नेरूळ, नवी मुंबई) व ज्ञानज्योती फाउंडेशन (उमरगा) यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रुक्माई मंदिर माकणी येथे मंगळवारी (दि. २६) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून २११ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अद्ययावत वैद्यकीय सेवा पोहोचवणे ही काळाची गरज बनली आहे. नेमका हाच धागा पकडून मुंबईच्या प्रसिद्ध तेरणा हॉस्पिटलने व ज्ञानज्योती फाउंडेशनने तालुक्यातील माकणी येथे या विशेष शिबिराचे आयोजन केले होते. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी थेट ग्रामीण भागात येऊन रुग्णांची तपासणी केल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग आणि सर्वसाधारण आजारांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर साठे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी लोहारा पंचायत समितीच्या सभापती पल्लवी जानकर, उमरगा पं. स. सभापती ॲड. आकांक्षा चौगुले, सास्तूरच्या सरपंच शितल राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस अनिल ओवांडकर, ग्रा.प. सदस्य निकेत पत्रिके, अण्णासाहेब साठे, शुभम साठे, राजवर्धन पाटील, ॲड. दादासाहेब जानकर, जिल्हा संयोजक दिलीप पवार, शुभम पाटील, दौलत पाटील तसेच ज्ञानज्योती फाउंडेशनचे कोषाध्यक्ष अमर देशाटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून २११ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामधील ७७ रुग्णांना पुढील गंभीर व अद्ययावत उपचारांची आवश्यकता असल्याने, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. या सर्व ७७ रुग्णांना पुढील उपचारासाठी नेरूळ, नवी मुंबई येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येणार असून, त्यांच्यावर तेथे पुढील उपचार केले जातील. शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यासाठी तेरणा हॉस्पिटलच्या नामांकित डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. यामध्ये डॉ. अजित निळे, डॉ. शलोक मोदी, डॉ. आर्य गुप्ता, डॉ. दृष्टी शहा, प्रतीक लोखंडे, उंबरे सर, अभिजीत वालेकर, आणि विनोद ओहाळ यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे तपासणी केली. तसेच जनसंपर्क अधिकारी अमित सय्यद व श्रीहरी गरड यांनी शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले. या शिबिराला स्थानिक पातळीवर यशस्वी करण्यासाठी तालुका सरचिटणीस निकेश बचाटे, किशोर गायकवाड, अजय पाटील, विजय साळुंखे, अमोल राजपूत, समीर पठाण, रिहान शेख, प्रा. आ. केंद्राचे किशोर जाधव, आशा कार्यकर्ते व स्थानिक युवा कार्यकर्ते महिला यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आरोग्य शिबीरमाकणी
Previous Post

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

Next Post

गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post
गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's