वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे राज्यात महामारीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण सर्व जण या महासंकटाचा सामना करत आहोत. कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आता कुठे पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत यावर्षी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. कोरोना काळात नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना मदत करावी असे आवाहन करत उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचेआमदार कैलास पाटील यांनी त्यांचा वाढदिवस वाढदिवस कोरोना योद्धांना समर्पित केला आहे.
याबाबत आमदार कैलास पाटील यांनी एक पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की,
नमस्कार,
उस्मानाबाद-कळंबसह महाराष्ट्रातील अनेक सहकारी, हितचिंतक, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच माझ्यावर प्रेम करणारा मित्र परिवार येत्या २५ फेब्रुवारी रोजी माझा वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूमुळे राज्यात महामारीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण सर्व जण या महासंकटाचा सामना करत आहोत. याच परिस्थितीत माझी राजकीय वाटचाल यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारी, योगदान देणारी अनेक वडीलधारी मंडळी, माझ्यावर प्रेम करणारे तरुण सहकारी, कार्यकर्ते मी गमावले आहेत.
कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आता कुठे पूर्ववत होत असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत यावर्षी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. कोरोना काळात नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना मदत करावी. त्याद्वारे माझा वाढदिवस साजरा केला तर मला निश्चितच समाधान वाटेल.
यावर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मी माझा वाढदिवस कोरोना योद्धांना समर्पित करत आहे. आपणा सर्वांना विनंती करतो की, माझ्या वाढदिवसानिमित्त जाहिरात फलक, अथवा होर्डिंग लावू नयेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता येत्या २५ फेब्रुवारी रोजी कोणताही कार्यक्रम अथवा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करू नये. फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मला आपले शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत, ही विनंती!
आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच माझ्या पाठीशी राहोत.
धन्यवाद..!
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकर्ते, हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा न करता माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जपत गरजू नागरिकांना मदत करावी असे आवाहन करणाऱ्या संवेदनशील आमदार कैलास पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!