वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नेहरू युवा केंद्र, उस्मानाबाद ( क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार ) यांच्या वतीने चालू असलेल्या जल शक्ती अभियान अंतर्गत कॅच द रेन याविषयी लोहारा तालुक्यातील जेवळी दक्षिण ग्रामपंचायत व लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात माहितीपत्रक देण्यात आले.
नेहरू युवा केंद्र, उस्मानाबाद ( क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार ) यांच्या वतीने जल शक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कॅच द रेनच्या माध्यमातून पाणी आडवण्याचे फायदे सांगण्यात येत आहेत. तालुक्यातील जेवळी दक्षिण ग्रामपंचायत कार्यालयात माहितीपत्रक देण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, सदस्य प्रवीण बोदाडे, राम मोरे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक किशोर होनाजे उपस्थित होते. तसेच लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात ही माहिती, चर्चासत्रे आणि पत्रके वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयचे उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे, प्रा. अभिजित सपाटे, प्रा. सुनंदा सूर्यवंशी, प्रा. अनिता पवार, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक किशोर होनाजे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.