Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात आढळला बिबट्या; काही वेळातच बेशुद्ध होऊन झाला मृत्यू

by admin
in आपला जिल्हा, ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी (दि.६) सकाळी एक बिबटया मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा बिबट्या बेशुद्ध होऊन त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

\"\"

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी सकाळी बिबट्या आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. उपस्थितांनी ही माहिती वनविभागाला कळविली. बेशुद्ध झालेला बिबट्या काही वेळाने मृत्युमुखी पडल्याचे समजते. वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर या बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजणार आहे. वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नर बिबट्या असून अंदाजे तीन वर्षे वय असावे अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: बिबट्याचा मृत्यू
Previous Post

योगेश केदार यांची सोलापूर विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीवर निवड

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी गिल्डा हिची राष्ट्रीय कबड्डी चाचणी स्पर्धासाठी निवड

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी गिल्डा हिची राष्ट्रीय कबड्डी चाचणी स्पर्धासाठी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!