Vartadoot
Sunday, August 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

मुख्य संपादक by मुख्य संपादक
02/08/2026
in आपला जिल्हा
A A
0
भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
Ad 10

धाराशिव : परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात,या उद्देशाने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ शनिवारी १ ऑगस्ट रोजी रामहारी मंगल कार्यालय, नगर रोड, भूम येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला.तर विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी १४३ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.


या कार्यक्रमास भूमच्या नगराध्यक्षा संयोगीता गाढवे, भूम पंचायत समितीच्या सभापती पूजा ढगे, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री काळे व विजयमाला मरकड, पंचायत समिती सदस्या श्रीलता लोखंडे, उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिरास सुरुवात झाली. यावेळी बोलताना नगराध्यक्षा संयोगीता गाढवे म्हणाल्या, प्रशासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असल्यास शासकीय योजनांचा लाभ योग्य पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो.


‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळत असून, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे. या शिबिरातून विविध योजनांचा ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना थेट लाभ देता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. शिबिरामध्ये नगर परिषद, आरोग्य विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भूमी अभिलेख, वन विभाग, महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, आरटीओ/वाहतूक शाखा, पोलीस विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, पोस्ट कार्यालय, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच तहसील कार्यालय आदी विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विविध शासकीय योजनांची माहिती, प्रत्यक्ष लाभ तसेच अर्ज स्वीकारण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भूममहाराजस्व शिबीरसमाधान
Previous Post

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's