वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित एकूण 87 गटांना एकूण रक्कम रु. 87 लाखाचे कर्ज वितरण करण्यात आले. उमेद बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी विविध उद्योग व्यवसाय करण्यासाठी गटांना कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक अंबुलगा, निलंगा, कासारसिर्शी, एसबीआय निटूर, निलंगा, दत्त नगर निलंगा,औराद, किल्लारी व बँक ऑफ महाराष्ट्र निलंगा अशा एकूण 10 बँकांनी 87 गटांना प्रति गट एक लाख प्रमाणे 87 लाख रक्कमेचे वितरण करण्यात आले आहे. या कर्ज वितरण मेळाव्याचे यशस्वी नियोजण प्रभाग समन्वयक उमा पोंदे, गोविंद रावते, त्रिंबक लहाने, संतोष पालखे, नितीन रोडे, लिंबराज कुंभार, सच्चीतानंद आयनिले, श्रीनिवास सूर्यवंशी यांनी केले.
या कार्यक्रमास तालुका अभियान व्यवसापक भगवान अंकुश व तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर हे उपस्थित होते. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांचे मार्गदर्शनाखाली व निलंगा पंचायत समिती सभापती श्रीमती राधा सुरेश बिराजदार यांचा प्रेरणेने सर्व उमेद कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी कर्ज वितरण करण्यात आलेल्या सर्व शाखा व्यवस्थापक यांचे तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.