वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी (दि.८) लोहारा पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संतोष रुईकर हे होते. यावेळी नगराध्यक्षा ज्योती मुळे, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक महिला दिनानिमित्त लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तहसीलदार संतोष रुईकर, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच तहसीलदार रुईकर, पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी महिला दिनानिमित्त विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी नगरसेविका जयश्री कांबळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा शरीफा सय्यद, सुनीता कांबळे, वंदना गायकवाड, महिला पोलीस कान्स्टेबल जगदेवी स्वामी, बेबीसरोज काजळे, कान्होपात्रा तेली, पोलीस पाटील मनीषा चाकूरे, मनीषा जगताप, शितल साळुंके, इंद्रजित लोमटे, दादा पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या हासुरे यांच्यासह महिला, शेतकरी उपस्थित होते.