Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन ? उद्या जाहीर होण्याची शक्यता

by admin
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा एकदा लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बुधवारी (दि १४) निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्व जिल्ह्यातील रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी सध्या तरी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समिती व सर्वपक्षीय नेत्यांसोबत लॉक डाऊन बाबत चर्चा केली होती. कोरोना रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठत असताना ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन पूर्वी काही वेळ नागरिकांना दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दि. १५ एप्रिल पासून हा लॉकडाऊन सुरू होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत आजच अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. १५ दिवसांचा हा लॉकडाऊन राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार, किती दिवसांचा लॉक डाऊन असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

\"\"

लॉकडाऊनची नियमावली आजच तयार होणार

मागील लॉकडाऊनचा विचार करता या लॉकडाऊन मध्ये काय नियम असतील याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. ही नियमावली आजच तयार केली जाणार आहे.

Tags: लॉकडाऊन
Previous Post

लोहारा तालुक्यात कोरोनामुळे ३१ वा मृत्यू – सोमवारी तालुक्यात आढळले ४८ रुग्ण

Next Post

राज्यात पुढील १५ दिवस १४४ कलम लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा – अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

राज्यात पुढील १५ दिवस १४४ कलम लागू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा - अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!