Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

by मुख्य संपादक
in महाराष्ट्र
A A
0

कष्टाला जर जिद्दीची आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली, तर यशाचे शिखर नक्कीच गाठता येते हे एका विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे.
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत प्रशांत काळे यांचा मुलगा सौरभ काळे याने थेट अमेरिकेत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत ७५ लाख रुपयांचे इंटर्नशिप पॅकेज मिळवले आहे. सौरभचे प्राथमिक शिक्षण लातूर आणि उच्च शिक्षण पुण्यात झाले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सौरभने इंजिनिअरिंगसाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) सारख्या नावाजलेल्या संस्थेत प्रवेश मिळवला. तिथल्या शैक्षणिक शिस्तीत आणि तांत्रिक अनुभवातून त्याने आपले कौशल्य विकसित केले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून त्याने अमेरिकेतील \”ड्युक\” या नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे एमईएम या मास्टर्स डिग्रीचा तो सध्या अभ्यास पूर्ण करत आहे. परदेशात शिक्षण घेत असताना केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता, सौरभने तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन बदलांचा अभ्यास केला. त्याच्या याच कौशल्यामुळे टेस्ला या जागतिक दर्जाच्या कंपनीने त्याला इंटर्नशिपची संधी दिली. विशेष म्हणजे, एका शिकाऊ विद्यार्थ्याला (इंटर्नशिप) ७५ लाख रुपयांचे मानधन मिळणे ही एक दुर्मिळ आणि मोठी घटना मानली जात आहे. त्याच्या या यशामुळे केवळ त्याच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.

\"\"


सौरभचे वडील प्रशांत काळे हे लोहारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिश विषयाचे प्राध्यापक आहेत. तर आई श्रीमती रेश्मा प्रशांत काळे या लातूर येथील लाहोटी शाळेत शिक्षीका म्हणून कार्यरत आहेत. घरातूनच शिक्षणाचे बाळकडू मिळाल्याने आणि वडिलांनी दिलेल्या शिस्तीमुळे सौरभने हे यश संपादन केले आहे. परदेशात जाऊन मिळवलेले हे यश इतर अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सौरभचे हे यश सांगते की, भारतीय शिक्षण पद्धती आणि विशेषतः महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधून शिकलेले विद्यार्थी जागतिक स्तरावर कोणत्याही स्पर्धेत टिकू शकतात. \”स्वप्न मोठी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्य ठेवा,\” असाच संदेश सौरभच्या या यशातून मिळतो.
सौरभच्या या देदीप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. सौरभच्या या यशामागे त्याच्या आई वडिलांचे खूप मोठे श्रेय आहे. त्याच्या आई वडिलांनी त्यांच्या जीवनात खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे सौरभने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे वडील प्रा. प्रशांत काळे व आई रेश्मा काळे यांचेही अभिनंदन केले जात आहे.

Tags: अमेरिकाटेस्ला
Previous Post

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

Next Post

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

Related Posts

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

Next Post

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!