वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे शुक्रवारी (दि.२३) ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना या महामारी विषयी सरपंच विठ्ठल साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून सरपंच विठ्ठल माणिकराव साठे यांची निवड झाली. तर उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच वामन वसंत भोरे, सदस्य म्हणून माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, प्रा. सिध्देश्वर साठे, अँड. दादासाहेब जानकर, तंटामुक्त अध्यक्ष पंडितराव ढोणे, माजी शिवसेना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी, सहशिक्षक संजय साठे, लिपिक किशोर चिकुंद्रे, ओमकार साठे, सहशिक्षक उमेश कडले, एस.टी.महामंडळाचे वाहक सुभाष आळंगे यांची निवड करण्यात आली. यावेळी गावात जे आयसोलेशन कक्ष सुरू करायचे आहे.
यासाठी लागणारा निधी हा लोकसहभागातून उभा करायचा आहे. यात २५ बेडची व्यवस्था, आँक्सिजन मशिनची व्यवस्था, इतर साहित्य खरेदी यासाठी लोकसहभागातून जमा झालेली रोख रक्कम नागरीकांनी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जमा केली आहे. दीड लाख रुपये जमा झाले असुन गावातील इतर नागरीकांनी मदत करावी असे आवाहन सरपंच तथा कोरोना समिती अध्यक्ष विठ्ठल साठे, उपाध्यक्ष वामन भोरे व कोरोना दक्षता समितीचे सर्व सदस्य, ग्रा.प.च्या सर्व सदस्यांनी केले आहे. या बैठकीसाठी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, सदस्य गोवर्धन आलमले, अच्युत चिकुंद्रे, बाळू कांबळे, अँड.दादासाहेब जानकर, ग्रामविकास अधिकारी एम. टी. जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. माने, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, माजी शिवसेना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.