वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने लोहारा ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरला दोन लाख चाळीस हजार रुपयांची औषधे मदत स्वरूपात देण्यात आली आहेत. मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी ( दि. २१) ही मदत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे यांच्याकडे सुपूर्त केली आहे.
लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोरोना काळात एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत करण्यात आली आहे. या काळात ग्रामीण रुग्णालयाला ज्या औषधांची गरज होती तीच औषधे आपण दिलात असे म्हणून डॉ. गोविंद साठे यांनी मेडिकल असोसिएशनचे आभार मानले. यावेळी लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भरत सुतार, सभासद विकास होंडराव, सुमित फावडे, प्रवीण अभंगराव, गणेश सारंग, सचिन बिराजदार, अप्पा देवकर, दिपक मुळे, प्रमोद बंगले, सोमनाथ माळी, बाबुराव पवार, डॉ. श्रीगिरे, विशाल सोमवंशी, विक्रम जावळे, कृष्णाथ घोडके, यशवंत कासार, गजानन बस्टे, भाऊसाहेब देशमुख, शाहूराज चव्हाण, विशाल सोमवंशी, सोन्या वाघमोडे, सत्तेश्वर ढोबळे, अविनाश भुजबळ, जावेद मुजावर, गणेश हिप्परगेकर, महेश खबोले, निखिल माशाळकर, पदमसिंह पाटील, महादेव सोलापुरे, खंडू सुलतानपुरे, फय्याज शेख, विनोद माने, विशाल जावळे, विष्णू मुसळे, ग्रामीण रुग्णालयातील खंडू शिंदे, डॉ. मुजावर, चांदणी मोरे, अल्लाबक्श बागवान, गिराम आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल मेडिकल असोसिएशनचे कौतुक केले जात आहे.