Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सोमवारी ( 24 मे ) 45 वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस झाली आहेत त्यांना मिळणार दुसरा डोस – लोहारा तालुक्यातील 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर , सालेगाव, लोहारा (खुर्द), उदतपुर, विलासपूर पांढरी येथे होणार लसीकरण

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. 24 मे रोजी 45 वर्षांच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाली आहेत त्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. याकरीता जिल्ह्यामध्ये 43 निवडक आरोग्य उपकेंद्र, 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 6 ग्रामीण रुग्णालय, 4 उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलीस रुग्णालय उस्मानाबाद याठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाली आहेत त्या लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5वाजेपर्यंत असणार आहे. लस घेण्याकरिता लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी किंवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने क्रमाने लस दिली जाणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.

लोहारा तालुक्यातील खालील ठिकाणी लसीकरण होणार आहे.

ग्रामीण रुग्णालय – लोहारा, सास्तुर,

आरोग्य उपकेंद्र – सालेगाव, लोहारा ( खुर्द), उदतपुर, विलासपूर पांढरी

Tags: कोविशील्ड लसलसीकरणलोहारा तालुका
Previous Post

युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते सास्तूर येथील विलगीकरण कक्षाचा शुभारंभ

Next Post

ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा कोरोना काळात मदतीचा हात – संस्थेने सुरू केले 25 बेडचे कोविड विलगीकरण केंद्र

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा कोरोना काळात मदतीचा हात - संस्थेने सुरू केले 25 बेडचे कोविड विलगीकरण केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!