वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक, शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर वाटप केले. शनिवारी ( दि. २२) हा उपक्रम राबविण्यात आला.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीत प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच बाहेर जाताना मास्क लावणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून लोहारा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील यांनी लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांना कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्क व सॅनिटायझर वाटप केले. तसेच शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, बाबा शेख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा शरिफा सय्यद, शहराध्यक्षा सुलोचना रसाळ, मिलिंद नागवंशी, सप्नील माटे, लक्ष्मण रसाळ, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शहराध्यक्ष प्रा.राजपाल वाघमारे उपस्थित होते.