वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी मोड येथे बुधवारी ( दि. २६) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विलगिकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.
मागील आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत भातागळी व परिसरातील कानेगाव, कास्ती खु, कास्ती बु., नागुर, आदी गावात मिळून जवळपास १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने या भागात विलगीकरण कक्ष सुरु करण्याची आवश्यकता होती. त्या पद्धतीने नागरिकांची मागणीही होत होती. ही गरज ओळखून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पुढाकारातून संत शिरोमणी मारुती महाराज बहुउद्देशीय संस्था भातागळी यांच्या सहकार्यातून व कानेगाव, भातागळी, कास्ती बु., कास्ती खु., नागुर, या ग्रामपंचायतींच्या मदतीने भातागळी मोड येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून बुधवारी (दि. २६) या कक्षाचा शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी मेनकुदळे, तहसीलदार संतोष रुईकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, नेताजी शिंदे, शिवसेना उपतालुकप्रमुख प्रताप लोभे, भातागळीचे उपसरपंच हणमंत कारभारी, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे, कास्ती बु. चे परवेज तांबोळी, कास्ती खु. चे सरपंच सागर पाटील, नागन्ना वकील, जालिंदर कोकणे, जगदीश लांडगे, महेबूब गवंडी, सुधीर घोडके, प्रेम लांडगे आदी उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!