वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून व माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका पौर्णिमा जगदीश लांडगे यांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

लोहारा शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेने लोहारा शहरातील संपुर्ण रस्ते, गल्ली व घरे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याच अनुशंगाने प्रभाग क्र. 4 मध्ये नगरसेविका पौर्णिमा जगदीश लांडगे यांच्या पुढाकाराने युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक शाम नारायणकर, जगदीश लांडगे, खय्यूम कुरेशी, मुनीर कुरेशी, सद्दाम बागवान, प्रेम लांडगे, ओम रेणके व प्रभागातील नागरिक यांनी या फवारणीस प्रारंभ केला.

आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या माध्यमातून लोहारा शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात ही फवारणी करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.






