वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील 21 गावात जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिले आहेत. 12 जून च्या सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
मागील काही दिवसांपासून लोहारा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी काही प्रमाणात रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. परंतु संसर्ग वाढू नये यासाठी तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी लोहारा तालुक्यातील 21 गावांमध्ये जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 2 ते 12 जून सकाळी 7 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मनाई हुकूम आदेश लागू केला आहे. तसेच खालील गावांमध्ये जनता कर्फ्यु लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सदरील आदेशात नमूद केले आहे.
या आदेशाप्रमाणे नमूद गावातील सर्व दुकाने पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील. तथापि रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न मेडिकल चालू राहतील. तसेच या गावातील नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदरील अत्यावश्यक सेवा पुरवताना सोशल डिस्टनसिंग व आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.