जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सभापती दिनकर कदम, माजी सभापती अरूण नाना डाके, नानासाहेब काकडे, जिल्हा उपनिबंधक श्री. फडणीस साहेब, उपनिबंधक कार्यालय प्रतिनिधी सुनिल जाधव, सिध्देश्वर सांगोळे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.