वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी (दि.६) शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून महाराष्ट्र गीतही सादर करण्यात आले.
६ जून राज्याभिषेक दिनाच्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. तसेच शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा याची संहिता सांगण्यात आली होती. त्याप्रमाणे लोहारा तालुक्यात पंचायत समिती कार्यालय , ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. शासनाच्या आदेशाप्रमाणे शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली होती. लोहारा तालुक्यातील सालेगाव येथेही शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच नारायण गुरव यांच्या हस्ते शिवस्वराज्यगुढी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामसेवक भोरे व गोपाळ माने यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी सरपंच नारायण गुरव, ग्रामसेवक भोरे, लादे सर, दिनकर गोरे, गोपाळ माने, मनोज देशपांडे, पांडुरंग गुरव, तानाजी पाटील, कमलाकर देशपांडे, अमोल कांबळे, प्रविण गोरे, संजय साळुंखे आदींसह नागरिक उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!