लोहारा (Lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शुक्रवारी (दि.३०) जलताराबाबत मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत डॉ. पुरुषोत्तम वायाल मार्गदर्शन करणार आहेत.
तालुक्यातील धानुरी येथील शेतकरी विकास संस्थेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या उद्भवलेल्या पाणी संकटावर भविष्यात कायमस्वरूपी समाधानकारक पर्याय म्हणून डॉ. पुरुषोत्तम वायाल अत्यंत कमी खर्चिक व अत्यंत प्रभावी जलतारा (jaltara) प्रणाली संशोधित केली आहे. याविषयी चर्चा, मार्गदर्शन व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शुक्रवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लोहारा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.







