तसेच तालुक्यात सेंद्रिय शेती साठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष लोहारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, कृषी सखी लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.