Vartadoot
Tuesday, June 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रीय निविष्टा – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे – लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील उमेद सेंद्रिय शेती सेवा केंद्रास दिली भेट

admin by admin
30/06/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लोहारा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान व राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत तालुक्यात गटातील महिला शेतकरी यांच्यासाठी सेंद्रीय शेती अभियान चालु आहे. त्या अंतर्गत आजपर्यंत तालुक्यात एकुण २७ गावामध्ये २० सेंद्रीय गट स्थापन झाले असून सेंद्रिय शेती करत आहेत. सदर सेंद्रिय शेती करणाऱ्या अभियानातील बेंडकाळ येथील कृषी सखी लक्ष्मी मोरे यांनी सुरु केलेल्या उमेद सेंद्रिय शेती सेवा केंद्रास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा अभियान संचालक अनिलकुमार नवाळे यांनी सोमवारी (दि.२८) भेट देऊन पाहणी केली. सदर सेवा केंद्राच्या माध्यमातून रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रीय निविष्टा हा चांगला पर्याय असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी व्यक्त केले. सदर केंद्राच्या माध्यमातून कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रीय निविष्ठा दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डी कंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, गांडुळ खत इ. सेंद्रीय निविष्ठांचे वापर कसे करावे याची माहिती देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पनात वाढ झाली आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी समाधान व्यक्त केले.तसेच तालुक्यात सेंद्रिय शेती साठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष लोहारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, कृषी सखी लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमेदसेंद्रिय शेती
Previous Post

श्री प्रतिप्रसाद सामाजिक संस्था लातूरच्या वतीने कंटेकूर येथे झाडाचे रोपण

Next Post

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस करणार लोकमंगल कारखान्या विरुद्ध आंदोलन – लोहारा तहसीलदार यांना दिले निवेदन

Related Posts

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
Next Post

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस करणार लोकमंगल कारखान्या विरुद्ध आंदोलन - लोहारा तहसीलदार यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's